पु.शिरोली येथे झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पुलाची शिरोली येथे झालेल्या मारहाणीत संकेत संदिप खामकर (वय 21.रा.पाडळी,ता.हातकंणगले )याचा शुक्रवार दि.14/06/2024 रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास बुधले मंगलकार्यालय परिसरातील पु.शिरोली शेजारी असलेल्या हॉटेल सह्याद्री जवळ झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने  त्यांच्या नातेवाईकांनी त्याला  उपचारासाठी  सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी शनिवार दि.15/06/2024 रोजी रात्री पावणे दोनच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची फिर्याद अमोल कोंडिबा खामकर यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिल्याने या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post