प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -करवीर तालुक्यातील कांडगाव येथे रहात असलेला अनिल सिद्राम झुलपे (वय 45) याचा सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मंगळवार दि.18/06/2024 रोजी साडेतीनच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत याने सोमवार दि.17/06/2024 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास कांडगाव येथे ग्रामोझोन नावाचे तननाशक सेवन केल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता आज त्याचा उपचार चालू असताना मृत्यु झाला.
----------------------------------
गव्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी.
शाहुवाडी - शाहुवाडी तालुक्यातील अणुस्करा येथील नामदेव सखाराम लाड (वय 80) यांना सोमवार दि.17/06/2024 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास अणुस्करा गाव्याच्या शेतात नामदेव लाड यांना गव्याने धडक दिल्याने त्यात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
--------------------------------------
अपघातात जखमी झालेल्या इसमाचा मृत्यु.
शाहुवाडी - शाहुवाडी येथील बाजीराव गणपती आलेकर (वय 53रा.शाहुवाडी) यातील मयत बाजीराव आलेकर यांचा सोमवार दि.17/06/2024 रोजी त्यांचा अपघात झाला होता.त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे त्यांच्यावर उपचार चालू असताना आज मंगळवार दि.18/06/2024 रोजी साडेपाचच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.