प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- पोलिस मुख्यालय येथे असलेल्या कवायती मैदानावर बुधवार (19) पासून सुरु असून आज गुरुवार दि.20/06/2024 रोजी मैदानी चाचणी साठी 1400/ उमेदवारांना बोलावले होते.पण हजेरी फक्त 921 जणांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी साठी हजेरी लावली होती.यातील दोन उमेवारांना काही कारणाने मैदानी चाचणी साठी पुढ़ची तारीख दिली आहे.दि.19/06/2024 रोजी चाचणी साठी असलेला एक उमेदवार आज गुरुवार दि.20 .रोजी शारिरीक व मैदानी चाचणी साठी उपस्थित होता.
कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात रिकाम्या झालेल्या 213 जागासाठी दि.19 जून पासून पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु झाली .पोलिस शिपाई पदाच्या रिकाम्या जागे साठी 19 जून ते 23 जून या कालावधीत मैदानी चाचणी होत आहे.
ही पोलिस भरती व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत.या सर्वावर पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत हे जातीने लक्ष ठेवून आहेत.