प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - सध्या भरधाव वेगाने वाहन चालवून अपघाताच्या घटनेत वाढ़ होत आहे.यात कुणाचा मुलगा,कुणाचे वडील तर कुणाची पत्नी अपघातात मरण पावत आहेत.या मुळे अनेक कुंटुबिय उघड्यावर पडली आहेत.यात कुणाचा विमा असेल तरच लाभ ते ही कितीतरी वर्षे कोर्टात केस चालते तेव्हा कुठे मयताच्या बाजूने निकाल लागतो.तो प्रर्यत त्या कुंटुबियाने जगायचे कसे तेव्हा प्रत्येक वाहन चालकांने आपली आणि आपल्या कुंटुबियांची काळजी घेणे वाहन चालविण्याची गरज आहे.आता पावसाळ्याचे दिवस असल्याने गाड्या घसरून अपघात घडतात म्हणुन प्रत्येक वाहन चालकाने चारचाकी वाला असूदें किंवा मोटारसायकलवाला यांनी ऑफिसला किंवा कामावर जाताना उशीर झाला तरी चालेल पण गाडीचा वेग वाढ़वून चालवू नका .आपण नोकरीवर उशीराने गेला म्हणुन तुम्हाला कुणी फासावर देणार नाही आणि लवकर गेला म्हणुन कुणी तुमचा सत्कार करणार नाही.आपला जीव लाखमोलाचा आहे.आपला जीव महत्वाचा मग नोकरी.
तुमच्या घरी तुमचे वयोवृध्द आई-वडील , पत्नी ,मुले तुमच्या येण्याची वाट पाहत आहेत हे लक्ष्यात असूद्या.