प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस भरती कवायती मैदानावर बुधवार दि.19/06/2024 पासून पोलिस भरती साठी आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी आज शुक्रवार दि.28/06/2024 रोजी यशस्वी रित्या पार पडली.
ही मैदानी चाचणी पुर्ण झाल्यानंतर या मैदानात कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी पोलिस भरती वेळी योगदान दिलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक ,सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी,पोलिस निरीक्षक यांच्यासह इतर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अशा सर्वाचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या आगळ्या वेगळ्या सन्मानाने सर्व जण भारावून गेले.त्या नंतर सर्वाना स्नेहभोजन देण्यात आले.त्यामुळे भरती प्रक्रिया वेळा राबलेला ताण हलका झाला.त्या नंतर सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आप आपल्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यास रुजू झाले.चालक पोलिस शिपाई यांची ड्रायव्हिंग टेस्ट आणि पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी लवकरच नियोजन करण्यात आले आहे.