प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोलीक पडसाळी येथे रहात असलेला निलेश बाळासो निकम (वय 31) याचा मंगळवार दि.11/06/2024 रोजी रात्री 10 च्या सुमारास रहात्या घरातील इलेक्ट्रीक बल्ब काढ़त असताना इलेक्ट्रीक शॉक लागून बेशुध्द पडल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,निलेश याचे मुळगाव पाचगाव ,कोल्हापूर असून त्याची सासरवाडी कोलीक पडसाळी आहे.तो गेल्या दहा वर्षापासून सासरवाडीत रहात असून त्याची स्वतःची ट्रॅक्स गाडी असुन बाजारभोगाव साइटला वडाप करीत होता.तो विवाहित असून त्याला दोन लहान मुली आहेत.सासरवाडीत कोलीक पडसाळी येथे त्याने वैयक्तिक जागा घेऊन त्याच्या घराचे नवीन बांधकाम चालू असताना हा प्रकार घडल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.