प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून भाजपचे समरजित घाटगे यांच्या पत्नीस तुम्ही मलेशियाला दिलेले पार्सल मध्ये अंमली पदार्थ असून तुमचा पासपोर्ट ही खोटा असल्याचे सांगून त्यांना 20 लाखांला गंडा घातला .आपली फसवणूक झाल्याचे समजताच निवेदिता समरजित घाटगे यांनी (वय 37.रा.नागाळापार्क) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हा प्रकार 2 जून ते 5जून या दरम्यान घडला .2 जून रोजी निवेदिता घाटगे यांच्या मोबाईलवर एका भामट्याने कस्टम अधिकारी असल्याचे सांगून तुम्ही मलेशियाला पाठविण्यासाठी दिलेल्या पार्सल मध्ये अंमली पदार्थ असून तुमच्या नावाचे बनावट पासपोर्ट आणि एटीएम आहे.ही बाब गंभीर स्वरुपाची असून तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.त्या नंतर वेगवेगळ्या मोबाईलवरुन फोन करून आम्ही गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी बोलत असल्याचे सांगितले.आणि या बाबत कारवाई करायची नसेल तर त्यांच्याकडे 20 लाखांची मागणी करत ऑनलाईन पैसे पाठविण्यास भाग पाडले .आपली फसवणूक झाल्याची समजताच निवेदिता घाटगे यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.त्या नुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.