घरात प्रवेश करून जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांस 24 तासात अटक करून मोटारसायकलसह मोबाईल असा एकूण 50 हजारांचा मुद्देमाल जप्त.

  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - जबरी चोरी करणारा चोरटा उमेश धोडिंबा शिंदे (वय 26.रा.तीनबत्ती चौक ,राजारामपुरी मुळगाव गोटरेवाडी ,बार्शी) याला बुधवार दि.12/06/2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चोवीस तासांत अटक करून त्याच्या कडील मोटारसायकलसह मोबाईल असा  50 हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्याला राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अधिक माहिती अशी की ,राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार दि.11/06/2024 रोजी चोरीची घटना घडली होती. त्याचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक  यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या.या पथकातील पोलिसांना तपास करीत असताना यातील चोरी करणारा चोरटा हा मोतीनगर येथे  एसएससी बोर्ड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव उमेश धोंडिबा शिंदे असल्याचे सांगितले.त्याच्याक्डील मोटारसायकल ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात मोबाईल सापडला तो जप्त करण्यात आला.या बाबत चौकशी केली असता प्रथम त्याने उडवा उडवी केली.त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मंगळवार दि.11/06/2024 रोजी पहाटे पाचच्या सुमारास वाय.पी.पोवार नगर येथे बांधकाम चाललेल्या घरात प्रवेश करून तेथे असलेली जुनी भांडी एका पोत्यात भरुन पळून जात असताना एका व्यक्तीने मला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याला धक्का बुक्की करून त्याला खाली पाडून त्याच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढ़ुन घेतल्याची कबुली दिली असता त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्याला पुढ़ील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर,सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ,पोलिस सुरेश पाटील,युवराज पाटील आणि अमित सर्जे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post