प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापुर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - वारे वसाहत येथे सुजल बाबासो कांबळे (वय 19.रा.टिंबर मार्केट) याचा गुरुवार दि.13/06/2024 रोजी दुपारच्या खूनाची घटना घडली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,सुजल हा आपल्या मित्रा सोबत तेथे असलेल्या मंदिरा जवळ बसला होता.त्या वेळी मोटारसायकल वरुन आलेल्या टोळक्यांनी हातात धारदार शस्त्रे घेऊन अचानक हल्ला चढ़विला त्यात सुजलच्या हातावर ,पाठीवर आणि पोटावर वार झाल्याने त्यात सुजल गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला.त्याच्या मित्रानी सुजलला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी सीपीआर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या खूनाची माहिती त्या परिसरात समजताच त्याच्या नातेवाईकांनी आणि साथीदारांनी मोठी गर्दी केली होती.या वेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी सीपीआर येथे भेट देऊन मयताच्या नातेवाईकांच्या कडुन माहिती घेऊन घटना स्थळी भेट देऊन पहाणी केली.पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.