कोल्हापूर : पोलिस अधीक्षक यांनी दाखविली आपल्या कृतीतुन तत्परता.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून पोलिस मुख्यालय येथे असलेल्या कवायती मैदानावर पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया चालू आहे.या साठी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत.यावर पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत हे जातीने लक्ष ठेवून आहेत.

काल गुरुवार दि.20/06/2024  रोजी कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी आणि रात्री झालेल्या पावसाने पोलिस भरतीच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने पोलिस भरती प्रक्रिया कशी राबवायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता .



या वेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी पाऊस थांबल्यानंतर रात्री 10 च्या सुमारास मैदानाची पहाणी करून मैदान योग्य करण्याबाबत आणि त्या साठी लागणाले साहित्य तात्काळ आणण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.तसेच सर्व साहित्य येई प्रर्यत ते स्वतःच थांबून राहिलेले होते.सर्व साहित्य मैदानावर आल्यानंतर ते मैदान कसे सुके करायचे याच्या सूचना दिल्यानंतर पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत हे आपल्या निवासस्थानी रात्री एकच्या सुमारास गेले आणि पहाटे साडेचारच्या सुमारास स्वतःमैदानावर हजर होऊन पोलिस भरती प्रक्रिया मैदानाची पहाणी केल्यानंतर मैदान पूर्ववत झाल्याची खात्री करून पहाटे पाच पासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू केली.या वेळी आलेल्या उमेदवारांचे कागदपत्रं तपासणी करून उंची आणि छाती याचे मोजमाप करूनच क्रिडा अधिकारी यांना मैदानावर बोलवून त्यांनी मैदान योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली.सध्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुनियोजित आणि पारदर्शक पध्दतीने सुरु आहे.पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना त्यांच्या रहाण्याच्या व्यवस्थेसह मैदानावर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पुरेपूर पोलिस यंत्रणा दक्षता घेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post