PRESS MEDIA LIVE :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी हरविलेले मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.त्यानुसार पोलिसांनी याचा तपास करीत असताना पोलिसांनी सीईआयआर म्हणजेच "सेंट्रल इक्वीपमेंट आयडेटी रजिस्टर "या तंत्रज्ञानाचा उपयोग करून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेत असताना मोबाईल मिळुन आले.
त्यानुसार गेल्या वर्षातील दोन आणि चालू वर्षातील सात असा एकूण एक लाख रुपये किमंतीचे 9 .मोबाईल शोधून त्यांच्या मुळ मालकांना आज बुधवार दि.19/06/2024 रोजी पोलिस ठाण्यात बोलावून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते मुळ मालकांना परत देण्यात आले.परत दिलेल्या मोबाईल 50 हजार ते पाच हजार किमंतीचे मोबाईलचा समावेश आहे.गहाळ झालेला मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर आंनंद ओसांडुन वहात होता.मोबाईल परत मिळाल्याने पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे आभार मानले.
सदरची कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप पवार ,पोलिस अंमलदार इर्षाद महात,पोलिस कॉ.मंगेश माने,किशोर पवार आणि प्रतिक शिंदे यांनी केली.