गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारयां महिलेचा मृत्यु.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कागल तालुक्यातील करनुर येथे रहात असलेली विवाहिता पुनम आनंदा बोंगे (वय 34.रा.करनुर ता.कागल) हिचा रविवार दि.02/06/2024 रोजी रात्री एकच्या सुमारास  सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.याची फिर्याद दिपक हिंदुराव बोंगे यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली.

अधिक माहिती अशी की,यातील मयत पुनम हिने दि.26/05/2024 रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास रहात्या घरात ओढ़णीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या नातेवाईकांनी गळफास सोडवून प्रथम कागल येथे मगदुम हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊन पुढ़ील उपचार कोल्हापूर येथे  अय्स्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करून तेथून पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रविवार दि.02/06/2024 रोजी रात्री एकच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post