लैंगिक अत्याचार प्रकरणी अल्पवयीन मुलास दंडासह तीन वर्षे सक्तमजुरी.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश पी.एम.सय्यदसो यांनी अल्पवयीन मुलास दोषी ठरवून 15 हजारांचा दंडासह तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे .

अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे सर्व्हिसिंग सेंटर आणि पंक्चर काढ़ण्याचे दुकान असून या दुकानात चार मंतीमंद मुले कामास आहेत.आरोपी अल्पवयीन बालकाचे वडील फिर्यादीच्या ओळखीचे असून त्यांच्या सांगण्यावरून आरोपीला प्रशिक्षणा साठी दि.01/06/2022 पासून कामावर ठेवून घेतले होते.नेहमी प्रमाणे आरोपी बालक दि.05/06/2022 रोजी सकाळी कामावर आला होता.फिर्यादी यांना दुपारी चारच्या सु मारास आरोपी दुकानात दिसत नसल्याने  फिर्यादीने त्याचा शोध घेत असताना त्यांच्या दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या पडक्या घराचा दरवाजा बंद दिसल्याने फिर्यादीने दरवाजा उघडून आत गेले तेव्हा आरोपी पीडीत मुलीस खिडकीत बसवून अश्लिल कृत्य करत असल्याचे आढळून आले.त्यांनी पळत जाऊन आरोपीस बाजूला ढ़कलून त्याच्या तावडीतून पीडीत मुलीची सुटका केली त्या वेळी आरोपी पळुन गेला.दरम्यान पीडीत मुलीच्या आईने व फिर्यादीने विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गोड बोलून या ठिकाणी आणून घाण काम केल्याचे सांगितले.या घटनेचे गांभीर्य ओळखून फिर्यादीने दि.05/06/2022 रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी आरोपीच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश पी.एम.सय्यदसो यांच्या कोर्टात चालून सरकारी पक्षातर्फे 14 साक्षीदारांच्या साक्षी   तपासण्यात येऊन कोर्टापुढ़े फिर्यादी,पीडीत मुलगी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या .तसेच अन्य साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकील Ad.सौ.अमिता ए.कुलकर्णी यांनी केलेला जोरदार युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानुन जिल्हा सत्र न्यायाधीश पी.एम.सय्यदसो यांनी आरोपीस दोषी ठरवून आरोपीस 15 हजारांचा दंड आणि तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

    या कामी सरकारी वकील म्हणुन Ad.सौ.अमिता ए.कुलकर्णी यांनी काम पाहिले असून त्यांना या कामी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजिवकुमार झाडे ,परि.पोलिस उपनिरीक्षक पी.एम.वाकळे यांच्यासह सहा.फौ.जनार्दन शिवाजी खाडे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post