कंळबा जेल मध्ये मुंबईतील बॉम्बस्फोट मधील शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा खून.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट घडवून आणणारा आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अलीखान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय 59.रा.मस्झिद बंदर ,मुंबई) याचा ड्रेनेजच्या टाकीचे सिंमेटचे झाकण डोक्यात मारुन खून केला.हा प्रकार सकाळी साडेसातच्या सुमारास दोन नंबरच्या सर्कल मध्ये असलेल्या स्नानगृहात घडली.या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी पाच न्यायालयीन कैद्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी  पत्रकारांना दिली आहे.

अधिक माहिती अशी की ,कंळबा जेल मधील सर्व कैदी नेहमी प्रमाणे रविवार दि.02/06/2024 रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास अंघोळी साठी बाहेर काढ़ण्यात आले .या वेळी सर्कल दोन मध्ये दगडावर बसून मनोजकुमार गुप्ता हा अंघोळ करीत असताना त्याच सर्कल मधील संशयीत प्रतिक पाटील,बबल्लु चव्हाण,सौरभ सिद,ऋतुराज इनामदार आणि दिपक खोत या सर्वानी मिळुन ड्रेनेजच्या टाकी वरील सिंमेटचे झाकण काढून मनोजकुमार याच्या डोक्यात,पाठीवर ,पोटावर ,चेहर्यावर आणि पायावर मारले.मनोजकुमार याच्या डोक्यात एक सारखे मारल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने जागीच ठार झाला.

या झालेल्या खून प्रकरणी मोका आणि खूनातील या पाच संशयीतावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी कंळबा जेलचे सुरक्षा रक्षक धीरज जगन्नाथ जाधव यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.

Post a Comment

Previous Post Next Post