तिटवे येथील विषारी औषध घेतलेल्या तरुणाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर /राधानगरी - राधानगरी  तालुक्यातील तिटवे येथे रहाणारा  गौतम भैरु कांबळे (वय 38.रा तिटवे ता.राधानगरी जि.को.) याचा शनिवार दि.08/06/2024   रोजी सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.

या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.अधिक माहिती अशी की, तिटवे येथील गौतम भैरु कांबळे यांने शुक्रवार दि.07/06/2024 सायंकाळी साडे सातच्या सुमारास कोणतेतरी विषारी औषध घेतले होते.त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे सीपीआर उपचार चालू असताना आज शनिवार दि.08/06/2024  रोजी दुपारी एकच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला.गौतम हा शेती करीत होता.तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.त्याच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post