प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कंळबा जेल मध्ये शिक्षा भोगत असलेला कैदी हा आज सकाळी अंघोळीसाठी तेथील हौदावर गेला असता अन्य कैद्या बरोबर वाद झाल्याने त्या चार ते पाच कैद्यानी मिळुन मुन्ना उर्फ मोहम्मद अलीखान उर्फ मनोजकुमार गुप्ता (वय 70) याच्या डोक्यात ड्रेनेज वरील झाकण मारल्याने त्याचा मृत्यु झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली .या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी जेल मध्ये जाऊन पंचनामा करून काही संशयीताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
गेल्या काही महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कंळबा जेल चर्चेत आले आहे.त्या कंळबा जेल मध्ये गांजा ,मोबाईल ,या सारख्या वारंवार आढ़ळत आल्याने अगोदरच वाभाडे निघत आहे.त्यातच ही खूना सारखी घटना घडल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे.या वरुन या जेलची सुरक्षा व्यवस्था ढ़ासळत चालल्याचे चर्चा आहे.