प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर /मुरगुड - तक्रारदार यांच्या शेत जमिनीला हक्कसोड पत्राप्रमाणे डायरी उतारयांवर नाव लावण्यासाठी लाचेची मागणी करणारा तलाठी प्रदिप अनंत कांबळे (वय 32.रा.रोहिदास गल्ली ,मुरगुड जगन्नाथ पुजारी यांच्या घरी भाड्याने मुळगाव तरसंबळे ता.राधानगरी) आणि त्यांचा साथीदार गणपती रघुनाथ शेळके (वय 46.रा.जैन्याळ ता.कागल) यांच्यावर लाचलुचपत च्या पथकाने मुरगुड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, तक्रारदार याची मुगळी गावात शेती असून त्या जमिनीचे हक्कसोडपत्र झाले असल्याने याची नोंद डायरी उतारयांवर होण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला होता .सदर डायरीला नाव लावण्यासाठी तलाठी प्रदिप कांबळे यांनी त्यांच्या ओळखीचा असलेला गणपती शेळखे यांच्या मार्फत 5000/रुपये लाचेची मागणी केली होती.त्यानुसार गणपती शेळके यांनी तक्रारदाराकडे मागणी केलेले 5000/रुपये हे लिंगनुर सर्कल यांच्याकडे देण्यास भाग पडल्याचे तपासात निदर्शनास आल्याने लाचलुचपतच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुरगुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे उशीराप्रर्यत चालू होते.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे,पोलिस निरीक्षक बापू सांळुंखे ,पोहेकॉ.विकास माने,सुनिल घोसाळकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.