प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कोल्हापूर जिल्हयात जमाव बंदीचा आदेश असताना आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी एका वकीलासह वीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद विजय यंशवत पाटील (पोहेकॉ.नेमणूक राजारामपुरी) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली.
अधिक माहिती अशी की , Ad.गिरीष नाईक हे यादवनगरातील मारहाण केलेल्या आरोपीना घेऊन बुधवार दि.05/06/2024 रोजी दुपारच्या सुमारास पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी जमावबंदीचा आदेश असताना जमाव एकत्र करुन बेकायदेशीररित्या मोर्चा काढून पोलिस अधीक्षक कार्यालयात जमाव गेल्याने तसेच जिल्हयात बंदी असून पाच पेक्षा जास्त लोक आणू नका असे सांगूनही कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी Ad. गिरीश नाईक (रा.कोल्हापुर) जनाबाई निवृती माळी,शेवंता जगताप ,वैजयंती माळी,लक्ष्मी शिंदे,निशा शिंदे,शालन जगताप,अंजना माळी,भारती शिंदे,रेश्मा जगताप,,इश्वर माळी,आकाश शिंदे ,देवेद्र शिंदे,अर्जुन शिंदे,संभाजी शिंदे,श्रीकांत माळी,मोहन जगताप ,करण शिंदे आणि दिपक जगताप (सर्व रा.यादवनगर) अशा वीस जणांच्यावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा तपास सहा.फौ.कोळी करीत आहेत.