शालेय पोषण आहार योजनेत अपहार केल्या प्रकरणी आठ जणांच्यावर गुन्हा दाखल.

 


प्रेस मीडिया लाईव्ह:

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु असलेल्या शालेय पोषण आहार योजनेत 28 लाख 89 हजारांचा अपहार केल्या प्रकरणी डाटा एन्ट्री ऑपरेटर तेजस्विनी इंद्रजित साठे,इंद्रजित मारुती साठे,सुलोचना मारुती साठे (सर्व रा.कंळबा ) सदाशिव पुंडलीक गायकवाड,नंदा सदाशिव गायकवाड स्वप्निल सदाशिव गायकवाड,वैष्णवी स्वप्निल गायकवाड आणि राहुल राजू खानकर (पत्ता माहित नाही)  या संशयीतावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद उदयसिंगराव पांडुरंग सरनाईक यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली.

अधिक माहिती अशी की ,जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार योजनेतील स्वंयपाकी आणि मदतनीस यांना देण्यात येणारे मानधन संबंधितांना न देता डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि त्यांच्या साथीदारांनी परस्पर आपल्या आणि ओळखीच्या लोकांच्या खात्यांवर चार वर्षाच्या दरम्यान 28 लाख 89 हजारांचा अपहार करून खात्यावर जमा केले. 

यातील संशयीत तेजस्विनी साठे यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी एप्रिल 21 ते मार्च 24 या दरम्यान    स्वंयपाकी आणि मदतनीस यांच्या खात्यावर जमा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आणि आपल्या ओळखीच्या लोकांच्या खात्यावर जमा करून फसवणूक केल्या प्रकरणी या आठ जणांच्यावर फ़सवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post