स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुर जिल्हयात अवैद्य व्यवसाय करीत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास दिल्या होत्या.या पथकातील पोलिस तपास करीत असताना त्यांना पोर्ले येथील पंकज मोरे यांच्याकडे दोन टेम्पो ट्रॅव्हर गाड्या असून तो चेसीस नंबर आणि रजिस्ट्रेशन मध्ये फेरफार करून वापरत असल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी बुधवार दि.05/06/2024 रोजी पोर्ले येथे जाऊन पंकज तानाजी मोरे (वय 25.रा.पोर्ले ता.पन्हाळा) याच्याकडे असलेल्या टेम्पो ट्रॅव्हर गाड्याची तपासणी केली असता गाड्या नंबर MH-20 -AS -5186 आणि MH-04-FK-1251 या गाड्याची तपासणी करून कागदपत्रे तपासली असता सदर गाड्याचे रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसीस नंबरात फेरफार केल्याचे दिसून आले.
या बाबत पोलिसांनी पंकज मोरे कडे चौकशी केली असता त्याने या गाड्या परमिटच्या असून त्याला परमिट TAX जास्त असल्याने बंद असलेल्या गाड्याच्या मालकांना शोधून त्यांच्या कडुन गाड्याचे कागदपत्रे विकत घेऊन त्यांच्या कडील चालू स्थितीत असलेल्या गाड्याचे नंबर टाकून त्या विकत घेतल्याचे कागदपत्रे दाखवून त्या गाड्या वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले.या बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले (रा.भारतीनगर ,मोरेवाडी ) हा प्रादेशिक परिवहन वाहन कार्यालय ,कोल्हापूर येथे एंजट म्हणुन काम करीत असून त्याच्या मदतीने बंद अवस्थेत असलेल्या वाहनाची कागदपत्रे संबंधित मालकाकडुन कमी किमतीत विकत घेऊन गरजू लोकांना ती कागदपत्रे देऊन त्या कागदपत्राच्या आधारे त्याच्या ओळखीचे असलेल्या करीम गफूर शेख (वय 52 .रा गोकुळ शिरगाव ) व इम्रान मिस्त्री (इंचलकरंजी ) याच्या कडुन पांजरपोळ,यादवनगर येथे असलेल्या ग्यरेजमध्ये चेसीसच्या नंबरात फेरफार करीत असल्याचे अशी माहिती पुढ़े आली.या माहितीच्या आधारे अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले आणि करीम गफूर शेख यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आणखी चार टेम्पो ट्रॅव्हर गाड्याचे चेसीस नंबरमध्ये फेरफार केल्याची कबुली दिली .अशा एकूण सहा टेम्पो ट्रॅव्हर गाड्यात फेरफार केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी 30 लाख रुपये किमंतीच्या सहा टेम्पो ट्रॅव्हर गाड्या ताब्यात घेतल्या असून त्यांच्यावर शासनाचा TAX चुकविण्यासाठी चेसीस नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरात फेरफार करून फसवणूक केल्याचा गुन्हा राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल केला असून आरोपी अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले,करीम गफूर शेख , पंकज तानाजी मोरे ,रुपेश विलास पवार (वय 34रा .बाईच्यापुतळ्या जवळ,राजारामपुरी) ,विशाल परशराम चव्हाण (वय 22.रा.अस्मितानगर ,अब्दुललाट ता.शिरोळ) आणि संभाजी आनंदा धनगर ( वय 33.रा.वडणगे ता.करवीर) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढ़ील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.