प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारा विशाल भालचंद्र पोवार (वय 39.रा.हैदर रोड शिवाजी पेठ,को.)याचा सोमवार दि.03/06/2024 रोजी दुपारी दिडच्या सुमारास सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मयत झाला .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत विशाल पोवार याने गुरुवार दि.24/05/2024 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास गांधी मैदानात किटक नाशक घेतले होते.त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे त्याच्यावर उपचार चालू असताना आज त्याचा मृत्यु झाला.विशाल हा विवाहीत असून तो टेलरींगचा व्यवसाय करत होता.