कोल्हापुरातील "ए.बी."टोळीवर हद्दपारीची कारवाई.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापूर शहरात असलेल्या ए.बी.टोळीचा प्रमुख अक्षय शेखर बागडी (रा.दत्तंंमंदीर  ,क.बावडा )याच्यासह त्याचे साथीदार सौरभ दिपक जाधव (रा.कनाननगर) आणि साहिल कादर शेख (रा.क.बावडा) यांना कोल्हापूर जिल्ह्यातुन पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले.

कोल्हापूर शहरात या ए.बी.टोळीच्या  वाढ़त्या गुन्हेगारीच्या पाश्वभुमीवर या टोळीवर आळा बसण्यासाठी शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी हद्दपारी कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणुन उपविभागीय पोलिस अधिकारी गडहिंगल्ज यांची नेमणूक केली होती.यांनी या प्रस्तावाची चौकशी करून याचा अहवाल पोलिस अधीक्षक यांच्याकडे सादर केला.सदर टोळीवर वचक बसावा आणि जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी "ए.बी.टोळीवर शुक्रवार दि.31/05/2024 रोजी हद्दपारीची केली.सदर टोळीतील हद्दपार झालेली व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यात आढ़ळल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post