प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात बदलून आलेल्या न्यायाधिशांचे बुधवार दि.19/06/2024 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वागत करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल आणि अध्यक्ष म्हणून बार असोसिएशनचे Ad.सर्जेराव खोत हे उपस्थित होते.
कोल्हापुरात न्यायालयात नव्याने बदलून आलेल्या न्यायाधिशांचा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे जेष्ठ वकील Ad. महादेवराव आडगुळे,Ad.पी.आर .पाटील, Ad.धनजंय पठाडे ,Ad. शिवाजीराव राणे ,Ad.अशोक पाटील,Ad. संपतराव पवार आणि Ad.गिरीश खडके यांच्या हस्ते गुलाबाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी नवीन न्यायाधिश एस.एस.इंदलकर आणि जिल्हा विधी सेवाचे सचिव पंकज देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या नंतर जिल्हा सरकारी वकील Ad. विवेक शुक्ल ,जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल , Ad.सर्जेराव खोत यांनी आपले विचार मांडले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन Ad.निशिकांत पाटोळे यांनी करुन आभार उपाध्यक्ष उमेश माणगावे यांनी मानले.या वेळी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आर.एल.चव्हाण,प्रशांत शिंदे,रणजीत गावडे ,यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.