आतषबाजी,घोषणा देऊन केला आनंद व्यक्त.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
वाशी ता.करवीर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय *अध्यक्ष नामदार रामदास आठवले* यांची केंद्रीय राज्यमंत्री पदी वर्णी लागल्याने वाशी येथे साखर,पेढे वाटून आतषबाजी करत रिपब्लिकन पार्टीचा जयघोष करण्यात आला.
देशामध्ये एनडीएचे सरकार स्थापन होऊन पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना गोपनीयतेची शपथ दिली.यावेळी नरेंद्र मोदीसह विविध राज्यातील 71खासदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शपथ घेतली. या शपथ सोहळ्यासाठी भारताच्या शेजारील देशांच्या प्रमुखांसह हजारो मोदी समर्थक उपस्थित होते.
नामदार रामदास आठवलेंचा शपथविधी सोहळा पार पडताच वाशी येथील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालया समोर नागरिकांना साखर पेढे वाटण्यात आले. यावेळी आकर्षक आतषबाजी करून नामदार आठवलें,रिपब्लिकन पार्टीच्या विजयाच्या घोषणानी वाशी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर,विजय कांबळे, सतीश कांबळे,दत्तात्रय कांबळे, बाबासो कांबळे,शुभम वाशीकर यांचेसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.