50 ते 60 वयाची अनोळखी महिला मृतावस्थेत सापडली.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर /जयसिंगपूर - शिरोळ तालुक्यातील जुने कवठेसार येथे शुक्रवार दि.21/06/2024 रोजी तेथे असलेल्या शेतात गट.नं.909. या परिसरात असलेल्या  वारणा नदी पात्राच्या उजव्या बाजूला एक अनोळखी महिला मृतावस्थेत आढ़ळली.या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

यातील मयत महिलेचे वर्णन पुढ़ील प्रमाणे या महिलेचे वय अंदाजे 50 ते 60 असून तिचा बांधा सडपातळ आहे.रंग गोरा आणि अंगात क्रिम कलरचा  त्यावर फुलांचे डिझाईन असलेला गाऊन व गुलाबी रंगाचा त्यावर पांढ़रयां ठिपक्या असलेला गाऊन   डोक्याला गुंडाळलेला असून गळ्यात काळ्या दोरयांत तावीज घातलेले आहे.उजव्या हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या दोन बांगड्या असून त्यावर पांढ़रे खडे आहेत.आणि उजव्या हाताच्या आतील बाजूस कोपरावर गोंदण आहे.

तरी वरील वर्णनाची अनोळखी मयत महिलेच्या बाबतीत काही माहिती असल्यास किंवा माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ खालील नंबर वर संपर्क साधावा.असे आवाहन पोलिसांच्या कडुन केले असून माहिती देणारयांचे नाव गुप्त ठेवले जाईल.व त्यांना योग्य बक्षिस दिले जाईल.

संपर्क-पोलिस निरीक्षक सत्यवान हाके मो.नं.9359363236.पोलिस उपनिरीक्षक विशाल जगताप मो.नं.9823217570.आणि पोलिस उपनिरीक्षक  प्रविण माने मो.नं.8799809108 या  नंबरवर संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post