प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - नेहमी वर्दळ असलेल्या दाभोळकर कॉर्नर परिसरात बस मध्ये चढताना त्रिवेणी विजय कांबळे (वय 45.रा.हुक्केरी ,बेळगाव) यांच्या पर्स मधील चोरट्यांनी दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.ही घटना मंगळवारी दोनच्या सुमारास घडली असून त्यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अधिक माहिती अशी की,त्रिवेणी कांबळे या दुपारच्या सुमारास केएमटी बस स्टॉप वर थांबल्या होत्या.त्यांची बस आल्यानंतर त्या गर्दीत चढ़त असताना त्यांच्या कडील असलेली कापडी पिशवी फाटल्याचे आढ़ळल्याने त्यातील पर्सची शोधत असताना ती सापडत नसल्यामुळे दागिन्याची पर्स नसल्याचे दिसून आले.तात्काळ त्यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.या चोरी झालेल्यात मोठे गंठण ,ब्रेसलेट ,झुबे आणि टॉप्स या दागिन्याचा समावेश आहे. या होत असलेल्या लागोपाठ चोरीच्या घटनामुळे महिला प्रवाशांत घबराट पसरली आहे.