प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - निवेदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठविण्यासाठी दिलेल्या पार्सल मध्ये अंमली पदार्थ आणि खोटा पासपोर्ट असल्याचे सांगून 20 लाखांची फसवणूक केलेला सीबीआयचा भामटा आणि कस्टम अधिकारी यांनी 20 लाखांचा ऑनलाइन फसवणूक केली होती.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी हा तपास शाहुपुरी पोलिसांच्या कडुन सायबर पोलिसांच्याकडे वर्ग केला आहे.
भाजपच्या समरजित घाटगे यांच्या पत्नी निवेदिता घाटगे यांनी मलेशिया येथे वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांकडे पाठविण्यासाठी एक पार्सल दिले होते.त्या भामट्या कस्टम अधिकारी यांनी निवेदिता घाटगे यांना मोबाईलवर फोन करून कारवाईची भिती दाखवत 20 लाख रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून उकळले होते.
या बाबत निवेदिता घाटगे यांनी फसवणूकीची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.पण हा प्रकार सायबरचा गुन्हा असल्याने पुढ़ील तपासासाठी सायबर पोलिसांच्याकडे सोपविण्यात आला.संबंधीताची बँकेची खाती गोठविण्यासाठी पोलिसांनी बँकांना मेल द्वारा पत्रव्यवहार करून संशयीताच्या शोधासाठी आवश्यकता वाटल्यास अन्य तपास यंत्रणेची मदत घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.