भिंत कोसळुन गंवडी ठार तर सुतार काम करणारा किरकोळ जखमी

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथे गंवडी काम करीत असताना अचानक भिंत कोसळून दयानंद बापू कांबळे (वय.61रा.नागाव ) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.ही घटना रविवार दि.23/06/2024 रोजी दुपारी दिडच्या सुमारास घडली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,वडकशिवाले येथील संजय शामराव पाटील यांनी आज रविवार (23) रोजी रिकाम्या जागेचे बांधकाम चालू करून ते नागाव येथील दोन गंवडी आणि वडकशिवाले येथील एक सुतार मिळुन कामास सुरुवात केली होती.आज दुपारी दिडच्या सुमारास शेजारची सिंमेट वाळूची भिंत अचानक कोसळुन गंवडी काम करीत असलेल्या दयानंद कांबळे यांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले .तर सुतार काम करीत असलेला मारुती सुतार हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू आहेत.दयानंद कांबळे यांच्या पश्च्यात पत्नी आणि एक विवाहित  मुलगी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post