फक्त आज मध्यरात्री पासून रिक्षा बंद.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुरात सर्किट बेंच आणि कोल्हापूर शहराची हद्दवाढ़ या साठी मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी आज मंगळवार दि.25 जुन रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौरा असल्याने कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक दिली होती.तसेच वाहनधारकांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा जाहीर केला होता.पण आजचा होणारा मुख्यमंत्री यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने कृती समितीच्या वतीने पुकारलेला कोल्हापूर बंदची हाक मागे घेतली आहे.तसेच कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने ही बंद मागे घेत असल्याचे सांगून कामकाज चालू होणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष Ad.सर्जेराव खोत यांनी सांगितले.
आज मध्यरात्री पासून रिक्षा बंद रहाणार आहेत.वाहनांसाठी पासिंग विलंब शुल्क आकारणी रद्द करण्यात यावी या मागणी साठी कोल्हापूर रिक्षा ,ट्यक्षी वाहनधारक समितीच्या वतीने सोमवारी रात्री पासून बंद ठेवण्यात येतील आहेत.