प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
मुरगूड - बोळावी येथे रहात असलेला देवराज साताप्पा पागम (वय 7 रा.बोळावी ,कागल) .यातील जखमी झालेला देवराज हा शनिवार दि.29/06/2024 रोजी दुपारी तीनच्या सुमारास रहाते घरी पातेल्यात उकडत घातलेली मक्क्याची कणसे काढ़त असताना पातेले कलंडल्याने त्यातील गरम पाणी अंगावर पडल्याने भाजुन जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,देवराज याच्या घरातल्यांनी कणसे उकडत घातली होती.वडील सिक्युरीटी गार्ड असून ते ड्युटीवर होते.त्याची आई कोळपण असल्याने शेतात गेल्या होत्या.तर मोठी बहिण आतल्या खोलीत टिव्ही पहात होत्या.देवराज आणि त्याची लहान बहीण हे दोघे पातेल्यातील उकडलेली कणसे काढ़त असताना भांडे कलंडल्याने त्या भांड्यातच बसल्याने त्याच्या सिटला भाजून जखमी झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
---------------------------------------
लोखंडी भाता डोक्यात लागून महिला जखमी.
कोल्हापूर - महाराणा प्रताप चौक येथे रहात असलेल्या राणी दिपक पोवार (वय 40.रा.घिसाड गल्ली)या शनिवार दि.29/06/2024 रोजी सकाळी अकराच्या सुमारास लोहार काम करीत असताना लोखंडी भाता डोक्यात लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
---------------------------------------
मोटारसायकल स्लिप होऊन जखमी.
कागल - कागल येथे रहात असलेला दौलत प्रकाश घाटगे (वय 48.रा.श्रमीक सोसायटी ,दावणे गल्ली कागल) यातील जखमी शनिवार दि.29/06/2024 रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास कर्जे पाण्ंद कागल येथे मोटारसायकल वरुन जात असताना त्याची मोटारसायकल स्लिप होऊन जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
---------------------------------------