पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची रहाण्याची व्यवस्था.


PRESS MEDIA LIVE : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापूर येथे पोलिस भरती बुधवार दि.19/06/2024  पासून कोल्हापूर पोलिस मुख्यालय येथे असलेल्या कवायती मैदानावर सुरु झाली असून काही  उमेदवार पोलिस भरतीसाठी अगोदर शहरात आलेले असतात.यातील काही जणांची रहाणेची सोय नसल्याने ते मिळेल त्या ठिकाणी झोपत असल्याने अशा उमेदवाराची गैरसोय होऊ नये याकरिता पोलिस प्रशासनाच्या वतीने रहाण्याची जेवणाची व्यवस्था पोलिस मुख्यालय येथे असलेल्या अंलकार हॉल मध्ये केलेली आहे.तसेच जे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी  रात्रीचे गस्तीवर असतात त्यानी भरती साठी आलेले उमेदवार रेल्वे स्टेशन ,एसटी स्टँडच्या परिसरात किंवा फुटपाथ अशा ठिकाणी झोपलेले आढ़ळल्यास त्यांना अंलकार हॉल येथे पोहचविण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत.

तसेच पोलिस भरती साठी आलेल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही आमिषाला पडू नये.जर कोणी आमिष दाखविण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्ष फ़ोन नं.0231-2662333 किवा 112 तसेच पोलिस उपअधीक्षक मुख्यालयात संपर्क साधावा.

पोलिस भरती साठी आलेल्या उमेदवारासाठी परेड ग्राउंड या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयसह ओआरएसची व्यवस्था केली असून वैद्यकीय पथकाची नेमणूक केली आहे.आलेल्या उमेदवारानी कोणत्याही आमिषाला अगर प्रलोभनाला बळी न पडता शारिरीक चाचणी द्यावी असेही आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post