अश्लिल व्हिडीओ व्हायरल करून शहरात खळबळ उडाली होती.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे
कोल्हापूर - सोशल मिडीयावर अश्लिल व्हिडीओ व्हायरल करून शहरात खळबळ माजविणारा कुडित्रे येथे रहात असलेला उमेश सुरेश भास्कर (वय.30) यांच्यावर पीडीत युवतीने शाहुपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने शाहुपुरी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
क.बावडा येथे रहात असलेल्या युवकाचे एका मुलीवर प्रेम होते.त्याच्या मोबाईल मध्ये त्यानी तयार केलेला अश्लिल व्हिडीओ त्या मोबाईलात होता.तो मोबाईल कुडित्रेच्या उमेश भास्करला विकल्याने त्यातील डाटा कॉपी करून घेतला होता.भास्कर याने काही अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याने दोन तीन दिवसापूर्वी शहरात खळबळ उडाली होती.त्या दिवशी दिवसभर त्याचीच चर्चा झाली होती.या प्रकारामुळे त्या प्रेमवीरांचे धाबे दणाणले होते.याची दखल पोलिस प्रशासनाने घेऊन वरिष्ठ अधिकारी यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या .
या प्रकरणी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी त्या व्हिडीओ विषयी संबंधित तरुणाला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली होती.या चौकशीत मोबाईल विकत घेणारा व्यक्तीने हा व्हिडीओ व्हायरल केल्याचे दिसून आले असता शाहुपुरी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.