प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - गगनबावडा तालुक्यातील आसळज पैकी नाळेवाडी येथे शेतीच्या वादातुन दोन कुंटुंबियात मारहाण होऊन खूनी हल्ला करण्यात आला होता.पोलिसांत दोन्ही कुंटुबिया कडुन एकमेका विरोधात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी या दोन कुंटुबिया विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात होता.हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या कोर्टात चालू होता.न्यायालयाने न्यायालया समोर आलेले पुरावे आणि त्यांच्या वकीलानी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानुन आज मंगळवार दि.18/06/2024 रोजी न्यायालयाने दोषी असलेल्या दोघांना सक्तमजुरी तर विरोधी गटाच्या दोघांना साध्या कैदेची शिक्षा सुनावली.या खटल्यात सरकारी वकील म्हणून Ad. एस.एस.इंगळे आणि Ad.एस.एस.तांबेकर यांनी काम पाहिले.
अधिक माहिती अशी की ,या दोन्ही कुंटुबियात शेतीच्या वादातुन आसळज गावात दि.23/02/2018 रोजी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार गिरजू म्हेतर यांच्या दारात दोन्ही कुंटुबियातील वाद मिटविण्यासाठी गावातील प्रतिष्ठित थांबले होते.या वेळी आरोपी प्रकाश म्हेतर आणि आकाश म्हेतर यांनी तलवार आणि चाकूने हल्ला करून यात फिर्यादी प्रदिप खेडेकर यांचा मामा सखाराम सोनबा गावकर यांच्या छातीवर छातीवर हल्ला केल्याने आड़वा आलेल्या सचिन खेडेकर जखमी झाला.यात लक्ष्मण बांडागले हे जखमी झाल्याने आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या समोर चालविण्यात येऊन सरकारी वकील यांनी एकूण तेरा साक्षीदार तपासून आरोपी प्रकाश म्हेत्तर आणि आकाश म्हेतर यांना सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली आहे.