प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूवक करून जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी डॉ.नितीन प्रभाकर देशपांडे यांनी मॉर्गन स्ट्यनले इंडिया प्रा.लि.या कंपनीसह ध्रुव पारेख आणि लिडा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी या कंपनीसह वरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.नितीन देशपांडे हे ऑर्थॉपेडिक डॉक्टर असून त्यांना मॉर्गन स्ट्यनले इंडिया या कंपनीने शेअर्स खरेदी विक्रीच्या नावाखाली 20 ते 80 % जादा परताव्याचे आमिष दाखविण्यात आले. नंतर परतावा आणि मुद्दल परत न देता एक कोटी पेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक केली.
ध्रुव पारेख आणि लिडा यांनी गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याचा वायदा केला.या कंपनीची चौकशी केली असता लिडा यांनी स्टॉक ब्रोकर असल्याचे सांगत कंपनीचा रजि.नंबर दिला.ही खोटी माहिती देऊन डॉ.देशपांडे यांच्या कडुन एक कोटी पेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक करून घेतली.मात्र ठरल्याप्रमाणे जादा परतावा न दिल्याने डॉ.देशपांडे यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली असता रक्कम परत देण्यास नकार दिला.या मुळे आपली फसवणूक झाल्याने डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.हा प्रकार 7 मार्च 24 ते 6 जुन 24 या दरम्यान घडला असून हा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.याचा पुढ़ील तपास आर्थिक गुन्हा शाखेकडील पोलिस करणार आहेत.