कोल्हापूरकरांचे मत गादीलाच .श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने विजयी.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्याचे लक्ष असलेल्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत  श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मा.खा.संजय मंडलीक यांचा 1 लाख 53 हजार मतानी पराभव केला.पहिल्या फेरी पासून ते शेवटच्या फेरी प्रर्यत छत्रपती शाहू महाराज यांनी आघाडी घेतली होती.शेवटच्या फेरी प्रर्यत प्रा.संजय मंडलीक यांना लिड तोडता आले नाही .


शेवटी छत्रपती शाहू महाराज यांनी 1 लाख 53 हजार मतानी पराभव करून एक नवा इतिहास निर्माण केला.यांच्या विजयाने एकच जल्लोष करून गुलालाची उधळण करून फटाक्याची आतषबाजी करून विजयाच्या घोषणा दिल्या .तर दुसरीकडे हातकंणगले मतदार संघात अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजीत पाटील हे 15 व्या फेरी प्रर्यत आघाडीवर होते.

शिवसेना गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात 15 व्या फेरी नंतर खरी चुरस निर्माण झाली .शेवटी धैर्यशील माने यांनी सत्यजीत पाटील यांचा 14 हजार 7 23 मतानी पराभव केला.त्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यानी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली .सांगली मध्ये दिग्ग्ज उमेदवार असूनही ज्याची तिकीट कापली त्या विशाल पाटील यांनी अपक्ष उभा राहून आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या चंद्रहार पाटील यांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन एक नवा इतिहास रचला.या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयात सतेज पाटील यांनी मोलाचे योगदान देऊन आपला करिष्मा दाखविला.

मतदार संघ कॉग्रेसला घेण्यापासून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी श्री.सतेज पाटील यशस्वी झाले.यावरच न थांबता स्वतः उमेदवार असल्या सारखे राबून त्यांची यंत्रणाही कामाला लागली.त्या मुळेच कोल्हापूर मतदार संघात श्री .पाटील यांचा "सतेज "करीष्मा दिसून आला.तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयात करवीरचे दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पिंजून काढला होता.मात्र त्यांचे 23 मे रोजी निधन झाले.आज शाहू महाराज यांच्या विजयात पाटील जल्लोष करण्यासाठी नसल्याने "गड आला पण सिंह गेला "अशा प्रतिक्रीया जनमाणसातुन उमटत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post