कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने, आस्थापना आदी. अनेक ठिकाणी कार्यरत असणाऱ्या, कामगारांची इत्यंभूत नोंद घेवून कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा --: सुरेश केसरकर

सहाय्यक कामगार आयुक्त यांचेकडे शिष्टमंडळाची आग्रही मागणी

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : कामगार कल्याण अधिनियम 1953 ला अनुसरून, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ या स्वायत्त संस्थेची वाटचाल सुरू आहे. या कायद्यातील नमूद तरतुदीनुसार पाच पेक्षा जास्त कामगार कार्यरत असणाऱ्या कापड दुकाने, हॉटेल्स, औषधी दुकाने, लहान लहान दवाखाने, पतसंस्था, सोसायट्या, मॉल्स, मालवाहतूक संस्था, यंत्रमाग कामगार, चांदी व्यावसायिक तसेच हस्तांतरीत साखर कारखाने अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व कामगार व कामगार कुटुंबियांना मंडळाच्या योजना व उपक्रमांचा लाभ मिळतो. ज्यायोगे कामगार व त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या योजना व उपक्रमांचा लाभ देऊन त्यांची सर्वांगीण उन्नती व प्रगती साधली जाते. 

         मात्र कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ५ पेक्षा जास्त कामगार कार्यरत असून सुद्धा त्याबाबतची अधिकृत नोंद कामगार आयुक्त कार्यालयाकडे दिसून येत नाही. या एकमेव कारणास्तव जिल्ह्यातील लाखो कामगार व त्यांचे कुटूंबिय शासनाच्या योजना व उपक्रमांपासून वंचित तसेच उपेक्षित आहेत, ही बाब निश्चितच भूषणावह नाही. 

         त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी घटनेने दिलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या कार्यालयात अथवा दुकानात ५ पेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत, त्या संबंधित मालक वर्ग तसेच आस्थापना प्रमुखांना कामगार आयुक्त कार्यालयाकडे कामगारांची रितसर नोंद करणेकामी ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी व संबंधित कामगार वर्गाला शासनाच्या योजना व उपक्रमांचा लाभ मिळवून द्यावा, अशा आषयाचे निवेदन शिष्टमंडळासमवेत सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांना दिले असलेचे व त्यांनी याबाबत त्वरीत सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही दिली असल्याचे, असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

यावेळी शिष्टमंडळामध्ये भगवान माने, संजय सासणे, बाजीराव हुलस्वार, अनिता काळे, सुभाष पाटील, विजय आरेकर, संजय चव्हाण, दिलीप लंबे, शशिकांत नवले, मोहन कांबळे, संदीप बनसोडे, बाळासाहेब सुतार, ध्रुवेधन शिंगे, भाऊसो पाटील, जयसिंग पाटील, दादासो कपटगे, रमेश देसाई, दीपक माळी, शुभम कोळी, प्रवीण जाधव आदी. सहकारी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------

राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळ्या भोवती केलेली आकर्षक विद्युत रोषणाई .

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दसरा चौक येथे राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळ्या भोवती केलेली आकर्षक विद्युत रोषणाई .

Post a Comment

Previous Post Next Post