पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना आज चौथ्या दिवशी 1011 बोलविले हजर फक्त 579.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पोलिस मुख्यालय येथे कवायती मैदानावर गेल्या चार दिवसापासून पोलिस भरती साठी आलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू असून आज चौथ्या दिवशी शनिवार दि.22/06/2024 रोजी 1011 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविले होते.पण या चाचणी साठी फक्त 579.उमेदवार हजर राहिले असून यात उंची ,वजन आणि छाती तपासणीत 99 उमेदवार अनफिट असल्याने 480 जणांची शारिरीक चाचणी घेण्यात आली.

राज्यात सर्वत्र पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यात 19 जुन ते 27 जून प्रर्यत भरतीची प्रक्रिया चालू असणार आहे.गेल्या चार दिवसापासून पोलिस भरती सुरळीत चालू आहे.पावसामुळे कोणताही या पोलिस भरतीच्या प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक यांना चाचणी मैदानावर इतर साहित्य मागवून सोय केली आहे.तसेच आलेल्या उमेदवारांची रहाण्याची आणि नाष्ट्याची सोय अंलकार हॉल येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने केली आहे.इतर जिल्हयात पोलिस भरतीचा फॉर्म भरलेल्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी 21 जूनला बोलविण्यात आलेल्या उमेदवारां पैकी 11 जण इतर ठिकाणी गेल्याने त्यांना चाचणी साठी येता आले नाही.त्यांना आज 22 जून रोजी चाचणी संधी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post