प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - टेंबलाईवाडी येथे पेट्रोलचा टँकर आणि वडापची रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले असून जखमीना रिक्षा चालकाने 108 अय्म्बुलन्सने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा प्रकार गुरुवार दि.27/06/2024 रोजी टेंबलाईवाडी येथे पाचच्या सुमारास घडला असून या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील रिक्षा चालक हा कोल्हापुरातुन पॅसेंजर घेऊन उचगावकडे चालला होता.त्या वेळी उचगावहून कोल्हापूरकडे येत असलेल्या पेट्रोलच्या टँकरने टेंबलाईवाडी येथे रिक्षास धडक दिल्याने रिक्षात बसलेले काशीबाई रामु लोहार (वय 55.रा.बाड ता.हुक्केरी) ,साईदमा अचया किन्नारा (वय 50.रा.यादववाडी ,उचगाव) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू आहेत तर अविन प्रदीप माने (वय 17) हा गंभीर जखमी झाला असून प्रथम उपचार सीपीआर रुग्णालयात घेऊन पुढ़ील उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.अविन हा दहावीत शिकत असून त्याला त्याच्या नातेवाईकांनी अकॅडमीत घातले होते.तेथुन घरी येत असताना हा अपघात झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.