प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कागल तालुक्यातील निढ़ोरी येथे रहात असलेला संकेत संपत तापेकर (वय 21.रा.मु.पो.निढ़ोरी ता.कागल ) याने सोमवार दि.03/06/2024 रोजी पाचच्या सुमारास रहात्या घरात ग्रामोझोन नावाचे विषारी औषध सेवन केले होते.त्याला प्राथमिक उपचारासाठी सनराईस हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.त्या नंतर शुक्रवार दि.21/06/2024 रोजी अडीचच्या सुमारास उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे उपचार चालू असताना शनिवार दि.22/06/2024 रोजी त्याचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हा शिक्षण घेत होता.त्याला एक मोठा भाऊ असून ते शेती करतात.संकेत याने ग्रामोझोन हे त्याने सेवन केले नसून शेतीवर औषध फवारणी करताना त्याचा वास नाका तोंडात गेल्याने हा प्रकार झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.