प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - न्यु पॅलेस येथील जुनेद दिलावर मोमीन (वय -49.रा.सरदार कॉलनी ताराबाई पार्क ,सध्या रा. न्यु पॅलेस ,रमणमळा) यातील मयत यांनी सोमवार दि.24/06/2024 रोजी रहात्या घरात दिडच्या सुमारास ओढ़णीने गळफास लावून घेतला असता हा प्रकार त्याच्या नातेवाईकांच्या लक्ष्यात येताच त्यांच्या नातेवाईकांनी गळफास सोडवून त्यांना बेशुध्दावस्थेत उपचारासाठी
सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचार चालू असताना दुपारी तीनच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी ,भाऊ असा परिवार आहे.यातील मयत हे ट्रक चालक होते.
----------
केमीकल उडुन भाजून जखमी.
कोल्हापूर - शिरोली एमआयडीसी येथे मेनन ×मेनन या कंपनीत पेंटींगचे काम करीत असताना विक्रांत विद्याद्यर नांदगावकर (वय 35.रा.गंगावेश ,उत्तरेश्वर ) हा सोमवार दि.24/06/2024 रोजी त्याच्या अंगावर केमीकल उडाल्याने त्यात भाजून जखमी झाला.त्याला उपचारासाठी त्याच्या मित्राने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
----------------------------------------
विषारी औषध घेतलेल्या तरुणाचा मृत्यु.
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे रहात असलेला नामदेव वसंत मगदूम (वय 35) याने रविवार दि.23/06/2024 रोजी दुपारी एकच्या सुमारास ग्रामोझोन नावाचे ओषध सेवन केले होते.त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना आज सोमवार दि.24/06/2024 रोजी सव्वा बारा वाजता मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.