स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -महाराष्ट्रात अंमली पदार्थ विक्री करण्यास बंदी असतानाही गांजाची विक्री साठी बेकायदेशीर त्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्या प्रकरणी दिलदार चौगोंडा कांबळे (वय 46.रा.उमळ्वाड़,ता.शिरोळ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्या कडील एक लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्याला पुढ़ील तपासासाठी जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.दिलदार कांबळे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून याच्यावर अंमली पदार्थ कायद्यानुसार जयसिंगपूर,शिवाजीनगर आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ अधिकारी यांनी कोल्हापुर जिल्हयात अंमली पदार्थांची विक्री होत असलेल्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या नुसार पोलिसांनी शोध घेत असताना त्यांना दि.27/06/2024 रोजी रेकॉर्ड वरील गुन्हेगार दिलदार चौगोंडा कांबळे हा उमळ्वाड़ येथे त्याच्या मालकीच्या रहात असलेल्या घराच्या पाठीमागे असलेल्या खोलीत अंमली पदार्थ गांजाची मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली असता त्याच्या घरावर छापा टाकून दिलदार कांबळे याला अटक करून त्याच्या कडील 7 कि.300 gm .वजनाचा एक लाख 80 हजार रुपये किमंतीचा गांजा आणि इतर असा एकूण एक लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके ,सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ,पोलिस उपनिरीक्षक संदिप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.