टोप येथे रस्त्या कडेला बोलत थांबलेल्या तरुणास टेम्पोने उडविले.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -टोप येथे मोटारसायकल रस्त्याच्या कडेला घेऊन बोलत थांबलेला रणजीत अशोक पाटील (वय 29. रा. मनपाडळे, ता. हातकंणगले) याचा शुक्रवार दि.14/06/2024  रोजी रात्री आठच्या सुमारास पाटील टेक टोप डॉन बिअर शॉपी जवळ झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी 108 अय्म्बुलन्स गाडीतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला. याची फिर्याद संभाजी विश्वास पाटील यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली आहे.

अधिक माहिती अशी की,यातील मयत रणजीत हा मोटारसायकल वरुन जात असताना त्याने आपली मोटारसायकल रस्त्याच्या कडेला घेऊन मोबाईलवर बोलत थांबला होता.त्या वेळी कासारवाडीहून मटेरिअल घेऊन चालेल्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला बोलत थांबलेल्या रणजीत पाठीमागून जोराची धडक देऊन तसाच पुढ़े गेल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.रणजीत याचे शिक्षण इंजिनीअरिंग प्रर्यत झाले असून सध्या तो नोकरीच्या शोधात होता.रणजीत हा अविवाहित असून आई वडील आणि एक विवाहित बहिण आहे.त्याच्या निधनाने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post