जेष्ठ समाजवादी नेते,विचारवंत आणि पत्रकार श्री.पन्नालाल सुराणा यांना राजर्षी शाहु पुरस्कार.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त राजर्षी शाहु  छत्रपती मेमोरियल ट्रस्ट ,कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा  सन 2024 चा  "राजर्षी शाहु पुरस्कार "जेष्ठ समाजवादी नेते,विचारवंत आणि पत्रकार श्री.पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये,स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.हा पुरस्कार राजर्षी शाहू महाराज यांच्या जंयती दिवशी बुधवार दि.26/06/2024 रोजी पालकमंत्री मा.हसन मुश्रीफसो आणि खा.छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत  सायंकाळी सहा राजर्षी शाहु स्मारक भवन,दसरा चौक .येथे संपन्न होणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.श्री.अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी समाजप्रबोधन,कला ,साहित्य,          क्रिडा ,संस्कृती आणि संगीत या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यारया व्यक्तीस 1984 पासून "राजर्षी शाहु पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.आता प्रर्यत 37 पुरस्कार देणेत आले असून आताचा 38 वा पुरस्कार असल्याचे सांगितले.

श्री.पन्नालाल सुराणा यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील पीडीत आणि शोषीत वर्गाला न्याय देण्याचे काम केले आहे.यांचा जन्म 9 जुलै 1933 रोजी झाला असून त्यानी पुणे येथे बी.ए.एल.एल.बी.पदवी घेऊन आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सामील झाले.तेथे काही काळ काम करुन समाजवादी पक्षात सामील झाले.त्यांनी महागाई विरोधात,दुष्काळ निवारण व शेतकरी वर्गाला जमिनी मिळवून देणे ,नामांतरसह आणीबाणी विरोधात चळवळीत भाग घेऊन त्यांनी सात वेळा तुंरुगवास भोगला आहे.श्री.सुराणा आणि अनंत भालेराव यांनी पत्रकारांच्या हक्कासाठी संघर्ष करीत असताना त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.पुढ़े श्री.सुराणा "दै.मराठवाडा" यांचे संपादक होते.लातुर येथे भुकंप होऊन अनाथ झालेल्या पोरक्या झालेल्या मुलांच्यासाठी स्वतःचं आपले घर हे वसतीगृह म्हणून चालविण्यास देऊन आधार दिला.गेली सत्तर वर्षे समाजातील वंचित घटक ,भूदान चळवळ,           पत्रकारिता आणि ग्रामविकास या क्षेत्रात श्री.सुराणा काम करीत आहेत.

या ट्रस्टच्या माध्यमातून दि.21 जून ते 25 जून 2024 या कालावधीत व्याख्यानाला आयोजित केला असून 26 जून 2024 रोजी राजर्षी शाहु जयंती दिनी शाहु पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post