चिमुकल्याचा खेळत असताना गटारीत पडुन मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर/इंचलकरंजी -हातकण्ंगले तालुक्यातील चंदुर येथे रहात असलेले सतीश पुजारी यांचा शौर्य नावाचा चिमुकल्याचा घराच्या दारात असलेल्या गटारीत पडल्याने मृत्यु झाला.हा प्रकार सकाळच्या सुमारास घडला असून या घटनेने त्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद इंचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,चंदुर येथे सतीश पुजारी हे आपल्या कुंटुबिया समवेत रहात असून त्यांना शौर्य नावाचा मुलगा आहे.शौर्य नेहमीप्रमाणे घरात खेळत असताना तो खेळत खेळत सर्वाची नजर चुकवून घराबाहेर गेला असता दारात असलेल्या गटारीत पडला.घरात खेळत असलेला शौर्य दिसेना म्हणुन त्याच्या नातेवाईकांनी सगळीकडे शोधा शोध घेत असताना गटारीत पडल्याचे आढ़ल्याने त्याला तात्काळ बाहेर काढ़ुन उपचारासाठी तेथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .

Post a Comment

Previous Post Next Post