वारे वसाहत येथे भर दिवसा तरुणाचा पाठलाग करून भिषण खून

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - वारे वसाहत येथे भर दिवसा सुजल बाबासो कांबळे (वय 19.रा.टिंबर मार्केट ) याचा पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी हातात धारदार शस्त्राने पाठलाग करून खून केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार गुरुवारी ता.13/06/2024 रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास रेसकोर्स नाका परिसरात असलेल्या भाजी मंडई येथे झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याच्या साथीदारांनी बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.याची फिर्याद त्याचा मित्र रघु रमेश कुर्डे याने सीपीआर  पोलिस चौकीत दिली.अधिक माहिती अशी की ,वारे वसाहत येथे रहात असलेला सुजल बाबासो कांबळे हा आपल्या मित्रा सोबत तेथे असलेल्या मंदीरा जवळ बसला होता.त्या वेळी मोटारसायकल वरुन आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी हातात तलवारी ,एडका घेऊन अचानक सुजल आणि त्याच्या मित्रावर हल्ला केल्याने या वेळी त्याचे मित्र पळून गेले.मात्र सुजल त्यांच्या तावडीत सापडल्याने सुजलवर तलवार ,एडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली असता सुजलने हातावर वार अडविल्याने त्याचा एक हात अर्धा तुटल्याने तेथून पळत सुटला त्या वेळी हल्लेखोरांनी पाठलाग करत त्याच्या पाठीवर ,मानेवर आणि पोटावर वार बसल्याने गंभीर जखमी होऊन खालीच कोसळला तेंव्हा हल्लेखोर पळुन गेले.सुजलचे मित्र घटना स्थळी आल्याने जखमी सुजलला त्याच्या दोघा मित्रांनी मोटारसायकलवर बसवून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला.सुजल हा तालमीत जात असल्याने पैलवान म्हणून परिचीत होता.या खूनाची बातमी त्या परिसरात पसरताच त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी सीपीआर आवारात गर्दी केली होती.या खूनाची माहिती पोलिसांना मिळाली असता जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गळवे आणि पोलिस कर्मचारी दाखल झाले.

आज पोलिस अधीक्षक कार्यालयात क्राइम आढ़ावा बैठक    चालू असताना या खूनाची माहिती समजताच शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके ,स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्यासह पोलिस मोठ्या संख्येने घटना स्थळी दाखल झाले.

या खूनातील संशयीत हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम चालू होते.

------------------------------------

या वेळी सुजलवर हल्ला होत असताना त्याचे मित्र घाबरलेले होते.त्यांना मोठा धक्का बसल्याने  सुजलची आठवण काढ़त सीपीआर आवारात रडत होते.

------------------------

जेथे सुजलचा खून झाला त्या परिसरात सीसीटिव्हीचे फुटेज  शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.मात्र घटना स्थळी हजर असलेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे कळते.

Post a Comment

Previous Post Next Post