मोक्यातील आरोपीची काठीने मारहाण करून शिवीगाळ करत दहशत.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कंळबा जेल मधील तुरुंगाधिकारी यांनी भेटण्यास आलेल्या नातेवाईकांना भेटण्यास उशीराने नेल्याच्या रागातुन मोक्यातील आरोपी असलेला कैदी विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याने तुरुंगाधिरी भारत उत्तरेश्वर पाटील (वय.50) यांच्यावर पाटील यांच्या हातातील काठी घेऊन मारहाण करत शिवीगाळ केली. हा प्रकार कंळबा जेलात अंडा सेल मध्ये सोमवारी दुपारच्या वेळी घडला.संशयीत काळभोर विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यापासून काळभोर हा कंळबा जेल मध्ये बंदीस्त असून त्याचा स्वभाव रागीट आणि तापट आहे.सोमवारी सकाळी त्याचे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी आले होते.काळभोर याला नेण्यासाठी तुरुंगाधिकारी भारत पाटील गेले होते.त्या वेळी पाटील यांना पाहून शिवीगाळ करुन तुला बघून घेतो अशी धमकी दिली.त्याला घेऊन जात असताना पाटील यांच्या हातातील काठी घेऊन मारहाण करत पोटात लाथ मारली.हा प्रकार पाहून इतर सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी धावत येऊन काळभोर याला परत कोठडीत डांबले .हा घडलेला प्रकार पाटील यांनी कारागृहाचे अधिक्षक विवेक झेंडे यांना सांगितला .त्यांच्याशी चर्चा करून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शासकीय कामात हस्तक्षेप आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयाच्या अनुमतीने हल्लेखोर काळभोर याला ताब्यात घेणार आहे.याचा तपास जुना राजवाडा पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे करीत आहेत.