परप्रांतिय तरुणाने अल्पवयीन मुलीस ब्लँकमेल करून 26 लाखांचे दागीने लुबाडले.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - परप्रांतिय तरुणाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून ताराबाई पार्क परिसरात रहात असलेल्या एका अल्पवयीन मुलीस बनीदास नावाच्या तरुणाने 26 लाख रुपये किमंतीचे 51 तोळे दागीने उकळल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली असून पोलिस बनीदास नावाच्या भामट्याचा शोध घेत आहेत.

अधिक माहिती अशी की,या भामट्याने अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढ़ुन तिचे एडिट केलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लँकमेल करून   गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुलीकडुन 26 लाख रुपये किमंतीचे 51 तोळे दागीने उकळल्याने भयभयीत झालेल्या अल्पवयीन मुलीने हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगीतल्याने उघडकीस आला.सदर भामट्याने त्या अल्पवयीन मुलीस आपण उच्चभ्रु कुंटुबातला असल्याचे भासवत त्या तरुणीला भेटू लागला .ती तरुणी बनीदासच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्याने त्याने या संधीचा फायदा घेत त्या मुलीकडे पैशाची मागणी करु लागला.तेव्हा त्या तरुणीने माझ्याकडे पैसे नाहीत पण आईचे  सोन्याचे दागिने आहेत असे सांगीतल्याने प्रथम 15 तोळ्याचा नेकलेस दिल्याने त्याचे धाडस वाढ़त गेले आणि तिला ब्लँकमेल करत अश्लिल फोटो दाखवत हे फोटो तुझ्या घरच्यांना दाखवितो म्हणत आणखी दागीने आणि पैशाची मागणी केली असता या अल्पवयीन मुलीने एकएक करून या प्रमाणे 26 लाख रुपये किमंतीचे 51 तोळे सोन्याचे दागिने घरच्यांची नजर चूकवत बनीदासला आणून दिले .हा प्रकार 19 एप्रिल ते 25 मे च्या कालावधीत घडला असून या प्रकाराने मुलगी घाबरल्याने सर्व हकीकत घरच्यांना सांगीतल्याने त्यानी याची फिर्याद शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली.

Post a Comment

Previous Post Next Post