प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोगील ब्रु.येथील श्रावणी विशाल गणाचारी (वय.6 रा.कोगील ब्रु.ता.करवीर ) हीचा सोमवार दि.10/06/2024 दुपारी एकच्या सुमारास रहात्या घराच्या दारात खेळत असताना ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी तिचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,कोगील ब्रु.येथे हळदीचा कार्यक्रम होता.त्या वेळी श्रावणी आपल्या मैत्रीणीसह तेथे खेळत असताना वडगावकडे जाणारयां रिकाम्या ट्रॅक्टरने खेळत असलेल्या श्रावणीला जोराची धडक दिली असता श्रावणी ट्रॅक्टरच्या बोनेटसह पुढ़च्या चाकाला धडकून मागच्या चाकात सापडली असता ती गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.तिचे वडील शेती करीत असून तिला तीन वर्षांची लहान बहीण आहे.श्रावणी ही पहिल्या वर्गात शिकत होती .या अपघाताची माहिती .गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे.