प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर /जोतिबा - जोतिबाडोंगर येथे शनैश्वर जयंती मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडली.या वेळी जोतिबा मंदीरात असलेल्या शनिदेवाच्या मुर्तीस पंचामृत अभिषेक घालण्यात आला.या जयंतीचे औचित्य साधून शनिदेवाची उत्सव महापुजा बांधण्यात आली.
या मंदीरा समोर नवदापंत्याच्या हस्ते होमहवन विधी पुजा करण्यात आली .श्रीचे मुख्यपुजारी प्रशांत दादर्णे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता शनि जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.या भाविकांनी पुष्पवृष्टि करून शनिदेवाचे दर्शन घेतले.या वेळी मच्छींद्र डवरी,गोरख डवरी ,विश्वनाथ डवरी आणि विश्वास झुगर यांनी आरती गायली.या वेळी भाविकांना सुंटवडा वाटून फटाक्याची आतिषबाजी करून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
श्री काळभैरव मंदिरासमोर असलेल्या शनिमंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती.या जंयती सोहळ्याचे आयोजन शनिचे पुजारी देवदास भोरे,अजित भोरे आणि दादा भंडारी यांनी केले होते.या वेळी देवस्थानचे प्रभारी धैर्यशील तिवले,सिंधीया ट्रस्ट जोतिबा कार्यालयाचे प्रभारी अजित झुगर ,गटविकास अधिकारी सोनाली मांडवकर ,मा.उपसंरपच जगन्नाथ दादर्णे ,मा.उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.दरम्यान कृष्णात संपत निकम यांच्या वतीने जोतिबा मंदीर येथे महाप्रसाद आयोजित केला होता.