प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - 7 जूनच्या अगोदर येणारा पहिला रविवार हा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे सरता रविवार म्हणुन साजरा केला जातो.महाराष्ट्र आणि कर्नाटकातुन आलेल्या लाखो भाविकांनी गुलाल खोबरयांची उधळण करत शेवटच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.
आता हा पालखी सोहळा चार महिन्या नंतर खंडेनवमीला पालखी सोहळा सुरु होणार आहे.येथे असलेले उंट ,घोडा हे जोतिबाच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे गावी संस्थानकालीन थट्टी वाड्यात त्यांची सोय केली आहे.सरता रविवारचे औचित्य साधून देवास पंचामृत आणि आमरस याचा अभिषेक घालून आमरस पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.सायंकाळच्या सुमारास श्री जोतिबाचे पुजारी ,वाजंत्री,उंट आणि घोडे देवसेकाच्या लवाजमा घेऊन देवाचा पालखी सोहळा बाहेर पडला.हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थासह भाविकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तेथील ग्रामस्थांनी नवीन कपडे घालून पुजारयांनी साखर पेढ़े वाटून घरोघरी आमरस पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.